केंद्रीयमंत्री @nitin_gadkari
साहेब यांची आज नागपूरमध्ये भेट घेऊन यापूर्वी मतदारसंघातून जाणाऱ्या नॅशनल हायवेसाठी भरघोस निधी दिल्याबद्दल मतदारसंघाच्यावतीने त्यांचे आभार मानले. यावेळी अहिल्यानगर-सोलापूर महामार्गावरील कर्जत तालुक्यातील टोलनाक्यावर स्थानिक नागरिकांना #टोलमाफी द्यावी, महामार्ग ओलांडताना अपघात होऊन नागरिकांचा बळी जाऊ नये यासाठी कर्जत तालुक्यातील नागमठाण आणि मांडली या गावांमध्ये #अंडरपास किंवा #ओव्हरपास बनववा, #कृषी उत्पादनाच्या निर्यातीला चालना मिळावी म्हणून मतदारसंघात #ड्रायपोर्टची स्थापना करावी तसंच सुरत-चेन्नई या प्रस्तावित ‘ग्रीन फिल्ड कॉरिडॉर’चं काम लवकर सुरु करावं आणि त्यासाठी भूसंपादन करताना शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मोबदला देण्याचीही मागणी केली.
श्रीगोंदा-जामखेड व अहिल्यानगर-करमाळा हे दोन्ही महामार्ग एकमेकांना छेदतात त्या माही जळगावमधील चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य असा अश्वारुढ पुतळा उभारण्याची मागणी गडकरी साहेबांकडं केली. नेहमीप्रमाणे या सर्व मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्याचं आश्वासन गडकरी साहेबांनी यावेळी दिलं.