आमदार रोहित पवारांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांबाबत धक्कादायक वक्तव्य
केलंय. आमदार अपात्रता प्रकरणी निकाला आधीच राहुल नार्वेकर राजीनामा देतील, असा धक्कादायक दावा रोहित पवारांनी केलाय. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलंय. आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसमोर सुनावणी सुरू असतानाच आमदार रोहित पवारांनी या प्रकरणाला कलाटणी देणारा दावा केलाय. सुप्रीम कोर्टानं आमदार अपात्रता प्रकरणात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना 31 डिसेंबरपर्यंत निर्णय घेण्याचा आदेश दिलाय. तर दुसरीकडे राहुल नार्वेकरांनी नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू असतानाच सुनावणीत खंड पडू दिलेला नाही. मात्र आमदार अपात्रता प्रकरणात सुनावणीत वेळ काढूपणा करण्यासाठी राहुल नार्वेकर राजीनामा देऊ शकतात असा तर्क रोहित पवारांनी लावलाय.
आमदार अपात्रता प्रकरण….रोहित पवारांचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांबाबत धक्कादायक वक्तव्य
- Advertisement -