नागपूर जिल्हा बँकेतील १५० कोटी रुपयांच्या घोटाळाप्रकरणी काँग्रेसचे नेते सुनील केदार यांना पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. कोर्टाने त्यांना दोषी ठरवल्यानंतर ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. सुनील केदार यांना शासकीय रुग्णालयात रात्री उशिरा दाखल करण्यात आले आहे. तीव्र डोकेदुखी आणि छातीत दुखत असल्यानं केदार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सुनील केदार यांची न्यायालयातून सेंट्रल जेलला जाण्यापूर्वी वैद्यकीय चाचणी करण्यात आली. सुनील केदार यांना तीव्र डोकेदुखी आणि छातीत दुखत असल्याने अस्वस्थ वाटत होते त्यामुळे केदार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांच्या निगराणीत केदार यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहे. तर इतर आरोपींना जेलमध्ये रवाना करण्यात आले आहे.