राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी मंत्री छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात संधी मिळणार अशी चर्चा असतानाच त्यांना मंत्रिमंडळातून डावलण्यात आले. यामुळे छगन भुजबळ कमालीचे नाराज झाले आहेत. तर “जहाँ नहीं चैना, वहाँ नहीं रहना”, असे सूचक वक्तव्य छगन भुजबळ यांनी केले. त्यामुळे ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. याबाबत विचारले असता उद्धव ठाकरे म्हणाले की, भुजबळ यांच्याबद्दल वाईट वाटले, अनेक आमदारांचे कोट घट्ट झाले आहेत. या सरकारची झाली आहे दैना, त्यामुळे तिकडे चैना वगैरे नाही, असे त्यांनी म्हटले. तर भुजबळ हे आता माझ्या संपर्कात नाहीत, मात्र ते अधूनमधून संपर्कात असतात, असे वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केले.
भुजबळ अधूनमधून संपर्कात असतात… माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंचे वक्तव्य…
- Advertisement -