नागपूर: विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या सातव्या दिवशी विरोधकांनी बेरोजगारांची थट्टा करणाऱ्या सरकारचा निषेध करत विधानभवन परिसरात प्रतिकात्मक भजी तळली. यावेळी सत्ताधाऱ्यांविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
महाविकास आघाडीतील आमदारांनी ‘पेपरफुटी झाली, काय दिवे लावले’, ‘भरतीची घोषणा, काय दिवे लावले’, ‘बेरोजगारी वाढली, काय दिवे लावले,’ ‘पीएचडीधारकांची थट्टा, काय दिवे लावले’, अशा घोषणा देत शुक्रवारी विधानभवन परिसर दणाणून सोडला.
सरकार बेरोजगारीच्या मुद्द्यावर गंभीर नाही. रोजगार देण्याऐवजी भजी तळण्याचा सल्ला सरकार देत आहे. त्यामुळे भजी तळून सरकारचा निषेध करण्यात आला आहे, असे अंबादास दानवे यांनी सांगितले.