महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे हे सध्या विधानसभेच्या तयारीसाठी राज्यव्यापी दौरा करत आहेत. विदर्भ दौऱ्यावर असताना आज त्यांनी नागपूर येथे पत्रकार परिषद घेतली. शिवसेना उबाठा गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्याविरोधात यावेळी उमेदवार देणार का? असा प्रश्न विचारल्यानंतर राज ठाकरे म्हणाले की, वरळी विधानसभेत आमची ३७ ते ३८ हजार मते आहेत. मागच्यावेळी आम्ही निवडणूक लढवली नाही. मात्र यावेळी आम्ही वरळी विधानसभेत उमेदवार देणार आहोत. याबरोबरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याही विरोधात उमेदवार देणार का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर राज ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्रात आम्ही सर्व जागांवर उमेदवार उभे करणार आहोत. त्यामुळे शिंदे आणि फडणवीस यांच्याही विरोधात उमेदवार देऊ, असे त्यांनी जाहीर केले.
आदित्य ठाकरे, शिंदे, फडणवीस यांच्याही विरोधात उमेदवार देणार, राज ठाकरेंनी रणनीती ठरवली…
- Advertisement -