लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका अगदी काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. अशात काही पक्षांमध्ये इन्कमिंग वाढलं आहे. भाजपमध्ये येणाऱ्यांची संख्या वाढते आहे. चक्क हिवाळी अधिवेशनातंच भाजपकडून पक्षप्रवेशाचे कार्यक्रम झाले आहेत. हिॅगणघाटचे भाजप आमदार समीर कुणावार यांनी विधानभवनातील पक्ष कार्यालयात पक्षप्रवेश उरकले.
हिंगणघाट मतदारसंघातील काँग्रेस, शिवसेनेच्या सरपंच आणि पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या नेत्यांनी आधी उपमुख्यमंत्री, भाजपचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर समीर कुणावार यांच्या प्रमुख उपस्थितीत विधानभवन परिसरातच पक्ष प्रवेश झाला.
आगामी निवडणुकीची तयारी म्हणून प्रत्येक मतदारसंघात भाजपकडून पक्षप्रवेशावर भर आहे. अशात हिॅगणघाटमधील काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. काँग्रेस शहराध्यक्ष संदीप देरकर यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे.