राज्य शासनाने घोषित केलेल्या नमो किसान महासन्मान योजनेतून राज्यातील सुमारे 86 लाख शेतकऱ्यांना 2 हजार रुपये प्रमाणे पहिल्या हप्ता मिळणार आहे. उद्या ( गुरुवारी दि.26 ऑक्टोबर) शिर्डी येथे होणाऱ्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एका क्लिकवर वितरण करण्यात येणार आहे. यासाठी कृषी विभागाने 1720 कोटी रुपये निधी उपलब्ध करुन दिला असल्याची माहिती कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.
पी एम किसानच्या पुढील हप्त्याबरोबर राज्य शासनाने जाहीर केलेल्या नमो किसान महासन्मान योजनेचा पहिला हप्ता देण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर पात्र लाभार्थी शेतकऱ्यांचे ई-केवायसी पूर्ण करणे तसेच अन्य अटींची पूर्तता करण्याबाबत ऑगस्ट महिन्यापासून विशेष मोहीम राज्य शासनामार्फत राबवली होती. या मोहिमेद्वारे राज्यातील 13 लाख 45 हजार शेतकरी पी एम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान योजनेसाठी कायमस्वरूपी पात्र ठरले आहेत. कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी याबाबत स्वत: पुढाकार घेतला आहे