‘झी’ला दिलेल्या मुलाखतीत अभिनेते नाना पाटेकर म्हणाले,”आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला साडे तीनशे ते पावणे चारशे जागा मिळतील. तसेच भाजपाला पर्याय नाही. नरेंद्र मोदीच तिसऱ्यांदा प्रंतप्रधान होणार”. नाना पाटेकरांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
नाना पाटेकरांनी लोकसभा निवडणुकीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपाला साडे तीनशे ते पावणे चारशे जागा मिळतील असं भाकित त्यांनी केलं आहे. देशभरात मोदी सरकार शानदार काम करत आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच त्यांना यश नक्कीच मिळेल. भाजपला बहुमत मिळणार आणि नरेंद्र मोजी पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान होणार”.