Saturday, May 25, 2024

अपघातानंतर नाना पटोलेंची प्रतिक्रिया,पोलीस तपासानंतर सत्य समोर येईल

महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या गाडीला भंडारा शहरालगत भीलवाडा गावाजवळ काल रात्री (९ एप्रिल) रोजी अपघात झाला होता. यावर त्यांची प्रतिक्रिया समोर आली होते. नाना पटोले प्रचार आटोपून सुकळी गावी जात होते, तेव्हा त्यांच्या कारला मागून येणाऱ्या ट्रकने धडक दिली होती. नशीब बलवत्तर म्हणून नाना पटोले थोडक्यात बचावले. तर त्यांच्या कारचे मोठे नुकसान झाले आहे.
त्यांनी अपघाताबाबत माध्यमांशी बोलताना सांगितलं की, भंडाराजवळ आमच्या गाडीला एक ट्रकने मुद्दामहुन धडक देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे गाडी एका बाजूने घासत घासत पुढे गेली. या अपघातामध्ये मला काहीही झालेलं नाही. परंतु गाडीचं मोठं नुकसान झालं आहे. जनतेच्या आशिर्वादामुळे मी व्यवस्थित आहे. या अपघाताबाबत पोलिसांत तक्रार दिलेली आहे. काळजी करण्याचं कारण नाही, असं नाना पटोले म्हणाले आहेत.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles