पक्ष निरीक्षक राधाकृष्ण विखे पाटील हे प्रताप पाटील चिखलीकर यांच्या पराभवाची कारणे जाणून घेण्यासाठी शनिवारी नांदेड दौ-यावर येणार होते. परंतु, ऐनवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघात येणार असल्याकारणाने दौरा रद्द करावा लागला. त्यानंतर रविवारी पक्ष निरीक्षक विखे पाटील यांचे विशेष विमानाने नांदेडमध्ये दुपारी बारा वाजताच्या सुमारास आगमन झाले.ते विश्रामगृहावर येण्यापूर्वीच कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ झाला. कार्यकर्त्यामध्ये शाब्दिक चकमक उडाली. निवडणुकीत काम केले नाही आणि बैठकीत हजर राहता, अस म्हणत कार्यकर्ते एकमेकांवर धावून गेले होते. दरम्यान पदाधिकाऱ्यांनी मध्यस्थी करत वाद मिटवला.
मंत्री विखे पाटील येण्याआधीच भाजपच्या चिंतन बैठकीत राडा..व्हिडिओ
- Advertisement -