Thursday, July 25, 2024

राजकीय वर्तुळात खळबळ, भाजप पदाधिकाऱ्याचा ठाकरे गटाच्या माजी नगराध्यक्षावर जीवघेणा हल्ला

नांदेडमधील राजकीय वर्तुळातून धक्कादायक घटना समोर आली आहे. नांदेडमध्ये भाजप पदाधिकाऱ्याने हिमायतनगरचे ठाकरे गटाच्या माजी नगरध्यक्षावर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या जीवघेण्यात हल्ल्यात माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

नांदेडच्या हिमायतनगरमध्ये भाजप युवा मोर्चाचे माजी तालुका अध्यक्ष राम सूर्यवंशी यांनी ठाकरे गटाचे माजी नराध्यक्ष कुणाल राठोड यांच्यावर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. भाजप युवा मोर्चाचे माजी तालुका अध्यक्ष राम सूर्यवंशी यांनी कुणाल राठोड यांच्यावर चाकू हल्ला केला आहे

राम सूर्यवंशी आणि कुणाल राठोड यांच्यात मागील काही दिवसांपासून राजकीय वाद होता. मंगळवारी रात्री भाजपचे राम सूर्यवंशी आणि ठाकरे गटाचे माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड यांच्या पुन्हा वाद झाला. या वादानंतर राम सूर्यवंशी यांनी कुणाल राठोड यांच्यावर चाकू हल्ला केला.कुणाल राठोड यांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत. राठोड यांच्यावर नांदेड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणी हिमायतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरु आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles