आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने तसेच स्वराज्य शक्ती सेना पक्षवाढी साठी करुणा शर्मा मुंडे ह्या राज्यभर दौरा करत आहे. गुरुवारी त्या नांदेडला आल्या होत्या. यावेळी त्यांनी पत्रकारांशी देखील साधला. स्वराज्य शक्ती सेना ही अन्यायाविरोधात लढणारा पक्ष आहे. सध्या सगळे पक्ष एकत्र आले आहेत. एकत्र येऊन गोरगरीब जनतेवर अन्याय अत्याचार होतं आहे. या अन्यायाविरोधात स्वराज्य शक्ती सेना लढणार, असल्याचे करुणा मुंडे म्हणाल्या. देशात लोकशाही संपली आहे. घराणेशाहीमुळे हुकुमशाही चालू आहे. भाजप पक्ष हा हजारो कोटींचा घोटाळा करणाऱ्या लोकांना घेऊन मोठ्या पदावर नेमणूक केलेली आहे. त्यांच्यामुळे सर्वसामान्य लोकांना आज न्याय भेटत नाही, असं देखील त्या म्हणाल्या.
आगामी विधानसभा निवडणूक ही मंत्री धनंजय मुंडेंविरोधात परळीतून लढण्याचा निर्णय देखील त्यांनी घेतला आहे. त्यांच्या या घोषणेने परळी विधानसभेची निवडणूक करुणा मुंडे वर्सेस धनंजय मुंडे अशी रंगतदार लढत होणार आहे.