सकल मराठा समाजाच्या तरूणांच्या रोषाला माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना पुन्हा एकदा सामोरे जावे लागले आहे.कोंढा (ता अर्धापूर जिल्हा नांदेड) येथे महायुतीचे उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रचारार्थ अशोक चव्हाण गाठी भेटी घेण्यासाठी सोमवारी आले आसता सकल मराठा समाजाच्या तरुणांनी गाडीला घेराव घालून एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचे आशा घोषणा दिल्या.सकल मराठा समाजाच्या तरूणांचा रोष पाहुन अशोक चव्हाणांना काढता पाय घ्यावा लागला.पोलीसांनी तरुणांना गाडी जवळून दुर करून चव्हाणांना सुरक्षित गावा बाहेर काढले. अर्धापूर तालुक्यात मराठा समाजाच्या आरक्षणची धग कायम असून सकल असुन सकल मराठा समाजाच्या तरूणांच्या रोषाला लोकप्रतिनिधींना सामोरे जावे लागत आहे.
मराठा समाज आक्रमक, प्रचारादरम्यान अशोक चव्हाणांना फिरावं लागलं माघारी…
- Advertisement -