नांदेडला शासकीय रुग्णालयातील रुग्णांच्या मृत्यूनंतर शिवसेनेचे (शिंदे गट) खासदार हेमंत पाटील यांनी रुग्णालयाला भेट दिली. यावेळी रुग्णालयातील अस्वच्छता पाहून संतापलेल्या हेमंत पाटलांनी थेट रुग्णालयाच्या डीनलाच स्वच्छतागृह साफ करायला लावले. हे प्रकरण हेमंत पाटलांना भोवले असून त्यांच्याव अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारानंतर विरोधकांनी टीका करत थेट राजीनाम्याची मागणी केली होती. अखेर खासदार हेमंत पाटलांवर नांदेडच्या ग्रामीण पोलीस ठाण्यात रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वतः डीन डॉ. एस. आर. वाकोडे यांनी तक्रार दाखल केली.
खासदार हेमंत पाटील यांनी केलेल्या गैरवर्तवणुकीसंदर्भात सेंन्ट्रल मार्ड आक्रमक झाले आहे खासदार हेमंत पाटील यांनी झालेल्या प्रकाराबद्दल माफी मागावी, अन्यथा डाॅक्टर्स महाराष्ट्रभर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
https://x.com/AbhijitKaran25/status/1709151186677547391?s=20