पिझ्झा हा आज भारतातील सर्वाधिक लोकप्रिय पदार्थांपैकी एक म्हणून ओळखला जातो. आपल्या आसपास अशी अनेक लोकं दिसतील ज्यांनी आयुष्यात कधीच पिझ्झा हा प्रकार खाल्लेला नाही. अशाच एका आजीबाईचा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. या आजीनं आपल्या आयुष्यात पहिल्यांदाच पिझ्झा चाखून पाहिला. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की आजीबाई बेडवर पिझ्झा घेऊन बसल्या आहेत. दरम्यान एक वृद्ध महिला दुसऱ्या वृद्ध महिलेला पिझ्झाचा एक स्लाईस देते. सुरुवातीला आजी तो स्लाईस घेण्यास नकार देते. पण मग चव चाखण्यासाठी तयार होते. मात्र पिझ्झाचा घास तोंडात घेतल्यानंतर आजी असे काही हावभाव देते जे पाहून तुम्ही देखील हसू लागाल.