नवी दिल्ली : नरेंद्र मोदी यांची तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेण्याची तयारी पूर्ण झाली आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या नेतेपदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची निवड झाल्यानंतर ते सत्तास्थानी विराजमान होणार आहेत. नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याचीही तयारी झाली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या शपथविधीनंतर महाराष्ट्रातून मंत्रिपदी कोणाला संधी मिळणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. मोदींच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील महाराष्ट्रातील खासदारांची संभाव्य यादी समोर आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीच्या तयारासाठी बैठकांचा सपाटा सुरु झाला आहे. नरेंद्र मोदी यांच्यासोबत आणखी काही खासदार मंत्रिपदाची शपथ शक्यता आहे. त्यात महाराष्ट्रातील खासदारांचाही समावेश आहे. मोदींच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील नेत्यांची मंत्रिपदाची वर्णी लागू शकते. मोदींच्या मंत्रिमंडळात भाजप, शिंदे गट, अजित पवार गटातील खासदार शपथ घेण्याची शक्यता आहे.
मोदींच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्र भाजमधून २ केंद्रीय मंत्री, २ राज्यमंत्र्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. भाजमधील खासदार पियूष गोयल, नितीन गडकरी, उदयनराजे भोसले, हेमंत सावरा आणि रक्षा खडसे यांच्या नावाचा समावेश होण्याची शक्यता आहे.
शिंदे गटाकडून प्रतापराव जाधव किंवा श्रीरंग बारणे यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडण्याची शक्यता आहे. तर शिंदे गटातील काही खासदार श्रीकांत शिंदे यांना मंत्रिपद मिळावं, यासाठी आग्रही आहेत. मात्र, त्यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता कमी आहे.अजित पवार गटाला मंत्रिपदाला मिळणार आहे. रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात प्रफुल पटेल यांना स्थान मिळण्याची शक्यता आहे. प्रफुल पटेल उद्या मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे.