Tuesday, February 18, 2025

मोदींच्या विरोधात वाराणसीतून ‘हा’ कलाकार निवडणूक लढवणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हुबेहूब मिमिक्री करणारा कलाकार म्हणजे श्याम रंगीला. श्याम रंगीला मोदींच्या मिमिक्रीमुळे चांगलाच चर्चेत आला. अभिनेता अक्षय कुमारनेही त्याचं कौतुक केलं होतं. आता याच शाम रंगीलाने निवडणुकीच्या मैदानात उडी घेतली आहे. एवढंच नाही तर तो वाराणसीतून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवणार आहे. श्याम रंगीलाने त्याच्या X पोस्टवर याबाबतची माहिती दिली आहे.
निवडणुकीचे दोन टप्पे पार पडले आहेत. त्याआधी सूरत आणि इंदूरमध्ये जे घडलं आहे ते उदाहरण श्याम रंगीलाने दिलं. तो म्हणाला “किमान लोकशाही धोक्यात नाही हे दाखवण्यासाठीच मी वाराणसीतून निवडणूक लढवतो आहे. या ठिकाणी लोकांना मतदानासाठी पर्याय माझ्या रुपाने उपलब्ध आहे. किमान या जागेवर सूरत किंवा इंदूरसारखी स्थिती निर्माण होणार नाही.” असं श्याम रंगीलाने म्हटलं आहे. सूरत आणि इंदूर या दोन लोकसभा मतदारसंघांतून दोन्ही उमेदवारांनी ऐनवेळी निवडणुकीतून माघार घेतली. त्यामुळे भाजपा तिथे जिंकणार हे नक्की झालं. असं वाराणसीतून होऊ नये म्हणून श्याम रंगीलाने वाराणसीतून निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे.

श्याम रंगीला म्हणाला मी ईडी, सीबीआय यांना घाबरत नाही. माझ्या अकाऊंटमध्ये काहीही मिळणार नाही. मी खरोखरच फकिर आहे, जो झोला घेऊन चालू शकतो. मी २०१७ पर्यंत मोदींना खूप मानत होतो, त्यांचा भक्तच होतो. मात्र नंतर माझ्या नक्कल करण्यावरही जेव्हा बंधन आलं तेव्हा मला ते पटलं नाही. मी आता मोदींविरोधात निवडणूक लढवणार आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles