अजित पवार गटातील नेते पुन्हा एकाद परतीच्या मार्गावर असल्याच्या चर्चा सुरू झाल्यात. या चर्चांवर आमदार नरहरी झिरवळ यांनी प्रतिक्रिया दिलीये.दादांची (अजित पवार) कामकाजाची पद्धत वेगळी आहे. साहेबांचंही (शरद पवार) काम मोठं आहे, साहेबांनी आत्तापर्यंत केलं ते दुसरं कोणी करणारही नाही, अशा शब्दांत आमदार नरहरी झिरवळ यांनी अजित पवार गटाचे आमदार परतीच्या वाटेवर असल्याच्या चर्चेला उत्तर दिलं आहे.
कोण कोणत्या वाटेवर आहे हे समजायला मार्ग नाही. पण असं होणार नाही. दादांची कामकाजाची पद्धत वेगळी आहे. साहेबांचंही (शरद पवार) काम मोठं आहे, साहेबांनी आत्तापर्यंत केलं ते दुसरं कोणी करणारही नाही. साहेबांसारखं काम भविष्यातही कोणी करणार नाही, असं नरहरी झिरवळ यांनी म्हटलं आहे.
तसेच पुढे ते म्हणाले की, ” साहेबांसारखं काम भविष्यातही कोणी करणार नाही, असं असलं तरी युवा नेतृत्व म्हणून अजित दादांकडे पाहिलं जातं त्यामुळे आमदार जाणार नाहीत, असं ठामपणे झिरवळांनी सांगितलं आहे.
दरम्यान, आज नरहरी झिरवळ यांचा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा जाहिरातीवर शरद पवार आणि श्रीराम शेटे यांचा फोटो लावण्यात आला आहे. त्यामुळे अजित पवार गटाचे आमदार परतीच्या वाटेवर असल्याच्या चर्चेला आणखी उधाण आलं आहे.