नगर: नगर दक्षिण आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडताच महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नाशिक मतदारसंघात प्रचार दौरा सुरू केला आहे. भाजपचे स्टार प्रचारक असलेले मंत्री विखे पाटील नगर जिल्ह्यातील मतदान होईपर्यंत जिल्ह्यातच ठाण मांडून होते. आता ते राज्यातील इतर मतदारसंघात प्रचार करीत आहेत.
नाशिक लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या निवडणूक प्रचारार्थ आज नाशिक शहरातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत रॅली काढण्यात आली. या रॅलीत विखे पाटील सहभागी झाले.
या रॅलीत केंद्रीय मंत्री डाॅ. भागवत कराड, राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह महायुतीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.