खासदार संजय राऊत यांनी नाशिकमध्ये महायुतीकडून पैसेवाटप होत असल्याचा आरोप केला आहे. “मुख्यमंत्री खाऊ घेऊन आले तो क्षण!” असं कॅप्शन देत संजय राऊत यांनी एक्स सोशल मीडिया अकाऊण्टवरुन एक व्हिडिओ ट्वीट केला आहे. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेलिकॉप्टरने नाशकात आले, त्यावेळचं दृश्य पाहायला मिळत आहे.
“मुख्यमंत्री खाऊ घेऊन आले तो क्षण! नाशिकमध्ये रात्रीस खेळ चाले.. नुसता पै पाऊस… दोन तासांच्या दौऱ्यासाठी इतक्या जड बॅगा पोलिस का वाहात आहेत? यातून कोणता माल नाशिकला पोहोचला? निवडणूक आयोग फालतू नाकाबंदी आणि झडत्या करत आहे. महाराष्ट्रात अधिकृत बॅगा वाटप सुरु आहे.” असं संजय राऊत यांनी व्हिडिओ ट्वीट करताना लिहिलं आहे.https://x.com/rautsanjay61/status/1789839004424106157