Tuesday, May 28, 2024

नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुक,नगर जिल्‍ह्यात निवडणुकीसाठी 19 प्रारुप मतदान केंद्रांची निश्चिती

नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुक

अहमदनगर जिल्‍ह्यात निवडणुकीसाठी 19 प्रारुप मतदान केंद्रांची निश्चिती

– जिल्‍हाधिकारी सिद्धाराम सालीमठ

अहमदनगर दि. 12 मे (जिमाका) :- भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्‍या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या निवडणुकीसाठी अहमदनगर जिल्‍ह्यात 19 प्रारुप मतदान केंद्रांची निश्चित करण्‍यात आली असल्‍याची माहिती जिल्‍हाधिकारी तथा निवडणुकीचे सहायक निवडणूक अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिली.

नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्‍या निवडणुकीच्‍या अनुषंगाने प्रारुप मतदान केंद्राच्‍या हरकतीबाबत सर्व राजकीय पक्षांसमवेत जिल्‍हाधिकारी कार्यालयाच्‍या सभागृहात बैठकीचे आयोजन करण्‍यात आले होते.

यावेळी जिल्‍हाधिकारी तथा सहायक निवडणूक अधिकारी श्री सालीमठ यांनी नाशिक विभाग शिक्षक मतदार संघासाठी तालुकानिहाय मतदान केंद्राची निश्चिती करण्‍यात आली असुन यामध्‍ये अकोले तालुका-1, संगमनेर-2, राहाता-2, कोपरगाव-2, श्रीरामपुर-1 नेवासा-1, शेवगाव-1, कर्जत-1, जामखेड-1, श्रीगोंदा-1, पारनेर-1, राहुरी-1, अहमदनगर शहर-2, अहमदनगर ग्रामीण-1 व पाथर्डी तालुक्‍यात 1 अशा एकुण 19 प्रारुप मतदान केंद्रांची निश्चिती करण्‍यात आल्‍याचे सांगितले. यावर बैठकीस उपस्थित राजकीय पक्षांच्‍या प्रतिनिधींनी कुठलाही आक्षेप नसल्‍याचे सांगितले.

या निवडणुकीसाठी बुधवार, १५ मे २०२४ रोजी अधिसूचना जारी केली जाईल. या निवडणुकीकरिता बुधवार, २२ मे २०२४ पर्यंत उमेदवारांना अर्ज दाखल करता येईल. उमेदवारांनी दाखल केलेल्या अर्जांची छाननी शुक्रवार, २४ मे २०२४ रोजी केली जाईल तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत सोमवार, २७ मे २०२४ अशी आहे. सोमवार, १० जून २०२४ रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान होईल. गुरूवार, १३ जून २०२४ रोजी मतमोजणी होईल. ही संपूर्ण प्रक्रिया दिनांक १८ जून २०२४ रोजी पूर्ण होईल, अशी माहितीही जिल्‍हाधिकारी तथा सहायक निवडणूक अधिकारी श्री सालीमठ यांनी यावेळी दिली.

बैठकीस सर्व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles