डॉ. बी. जी. शेखर पाटील पुन्हा नाशिकला
नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक म्हणून डॉ. बी. जी. शेखर पाटील यांनी पुन्हा सुत्रे स्वीकारली. त्यांची मुदत संपण्यापूर्वीच राज्य सरकारने त्यांची बदली केली होती. त्यांच्या जागी महानिरीक्षक दत्तात्रेय कराळे यांची नियुक्ती करण्यात आली होती. या निर्णयाविरोधात डॉ. शेखर यांनी केंद्रीय प्रशासकीय लवादाकडे (कॅट) दाद मागितली होती. कॅटने त्यांची बदली रद्द करून नाशिकला नियुक्तीचा आदेश दिला होता.
नंतर कॅटच्या निर्णयाविरोधात महानिरीक्षक कराळे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्याचा निकाल आज आला. न्यायालयाने कराळे यांची याचिका फेटाळून लावत डॉ. शेखर यांची नाशिकमधील नियुक्ती कायम ठरविली. त्यानंतर डॉ. शेखर पाटील यांनी पुन्हा पदाची सूत्रे स्वीकारली.