संजय राऊत विरुद्ध अजित पवार असा सामना रंगलेला पाहण्यास मिळतो आहे. संजय राऊत यांनी अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. रविवारी सासवड या ठिकाणी सुप्रिया सुळेंच्या प्रचारार्थ जी सभा झाली त्या सभेतही अजित पवारांवर संजय राऊत यांनी जोरदार टीका केली.
अजित पवार यांनी २०१९ मध्ये शरद पवारांनी सांगितलं म्हणूनच भाजपासह गेलो असं सांगितलं. पडद्यामागच्या हालचालीही सांगितल्या. याबाबत विचारलं असता संजय राऊत म्हणाले, “किती दिवस या सगळ्या गोष्टी सांगणार? हे सगळं गुळगुळीत झालं आहे. दुसरं काहीतरी बोला, धमकी वगैरे द्या. अजित पवारांची ख्याती ही धमकी बहाद्दर अशी झाली आहे. रोज उठून मतदारसंघातल्या १० जणांना ते धमक्या देतात. त्यांनी वैचारिक वक्तव्यं करु नयेत त्यांना ती शोभत नाहीत.” असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.