राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांच्या कुटुंबियांवर आर्थिक अडचण निर्माण झालीय. नाशिक जिल्हा सहकारी बँकेकडून थकीत कर्ज प्रकरणी भुजबळ कुटुंबियांना नोटीस बजावण्यात आलीय. गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्हा सहकारी बँक थकीत कर्जामुळे आर्थिक अडचणीत आलीय. थकीत कर्ज वसुलीसाठी बँकेकडून विविध माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. यात थकबाकीदारांना नोटीसा देखील बजावण्यात आल्या आहेत. नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील दाभाडी येथील भुजबळ कुटुंबियांच्या मालकीच्या आर्मस्ट्राँग इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लिमिटेड या साखर कारखान्याला थकीत कर्ज प्रकरणी नोटीस देण्यात आलीय. एकूण ५१ कोटी ६६ लाखांच्या थकबाकी वसुलीसाठी बँक प्रशासनाकडून कारखान्याचे संचालक असलेल्या मंत्री छगन भुजबळ यांचे पुत्र माजी आमदार पंकज भुजबळ आणि पुतणे माजी खासदार समीर भुजबळ यांना नोटीस बजावलीय. बँकेच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी साखर कारखान्याच्या स्थळावर जाऊन ही नोटीस चिकटवल्याची माहिती मिळालीय. त्याचप्रमाणे कारखान्याचे संचालक असलेल्या समीर आणि पंकज या भुजबळ बंधूना देखील नोटीस देण्यात आलीय.
भुजबळ कुटुंबियांना जिल्हा बँकेची नोटिस…51 कोटींचे कर्ज वसुली प्रकरण
- Advertisement -