तेलंगणा पोलिसांनी मोठी कारवाई करत शिवसेना (शिंदे गट) च्या माजी महिला पदाधिकारी लक्ष्मी ताठे यांना अटक केली आहे.
माहितीनुसार, पोलिसांनी लक्ष्मी ताठे यांना गांजा तस्करी प्रकरणात अटक केली आहे. तेलंगणा पोलिसांनी नाशिक पोलिसांच्या मदतीने लक्ष्मी ताठे यांना नाशिकच्या पंचवटी परिसरातून अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 8 जून 2024 रोजी तब्बल 190 किलो गांजा तेलंगाणाच्या दामेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी पकडला होता आणि याच प्रकरणात लक्ष्मी ताठे यांना अटक करण्यात आली आहे. यापूर्वी या प्रकरणात पोलिसांनी अहमदनगर आणि बीडमधून दोन जणांना अटक केली होती. त्यानंतर या प्रकरणाचा तपास करत असताना लक्ष्मी ताठेंच नाव समोर आला होता. त्यामुळे लक्ष्मी ताठे यांना अटक करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.