Saturday, May 18, 2024

महायुतीचे उमेदवार अडचणीत ?सकल मराठा समाजाचा ‘मविआ’ उमेदवारांना पाठिंबा

नाशिक जिल्हा मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेत नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघातून ठाकरेसेनेच्या राजाभाऊ वाजे, तर दिंडोरी लोकसभा मतदारसंघात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे भास्कर भगरे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. मराठा आरक्षणासाठी उपोषण, आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी पाठिंबा देण्याबाबत अद्याप तरी कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. पण नाशिक मराठा क्रांती मोर्चानं घेतलेल्या भूमिकेमुळे संभ्रम निर्माण झाला आहे.नाशिकमधील मराठा मतदारांचं प्रमाण तब्बल ७० टक्के आहे. महायुतीचे हेमंत गोडसे, महाविकास आघाडीचे राजाभाऊ वाजे दोघेही मराठा समाजातून येतात. सकल मराठा समाजानं घेतलेल्या भूमिकेचा थेट फायदा वाजेंना होऊ शकतो. दिंडोरीतही अशीच परिस्थिती आहे. राखीव मतदारसंघ असलेल्या दिंडोरीमध्ये मराठा मतदार ३५ ते ४० टक्के इतकं आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles