Monday, July 22, 2024

नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुक १५ उमेदवारांनी माघार, २१ उमेदवार रिंगणात

नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत एकूण १५ उमेदवारांनी माघार घेतल्यानंतर आता या निवडणुकीमध्ये एकूण २१ उमेदवार रिंगणात राहिले आहेत

परिणामी काही प्रमुख पक्षाच्या उमेदवारांनी अद्यापही आपले अर्ज तसेच ठेवल्याने बंडखोरीची लागण झाली आहे. आज उमेदवारी अर्ज मागे घेणाऱ्यांमध्ये प्रामुख्याने काँग्रेसचे उमेदवार दिलीप पाटील, तसेच अपक्ष उमेदवार राजेंद्र एकनाथ विखे पाटील, भाजपप्रणित अपक्ष उमेदवार धनराज देविदास विसपुते, अपक्ष उमेदवार भास्कर तानाजी भामरे, अविनाश साळी, सुनील पंडित, दत्तात्रय भाऊसाहेब पानसरे, जायभावे कुंडलिक दगडू यांच्यासह आदी एकूण १५ उमेदवारांनी माघार घेतली आहे.दरम्यान १५ उमेदवारांनी माघार घेतल्यानंतर निवडणुकीच्या रिंगणात आता २१ उमेदवार उभे

यामध्ये महायुतीमधील शिंदेंच्या शिवसेनेकडून किशोर भिकाजी दराडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून महेंद्र मधुकर भावसार, महाविकास आघाडीतील ठाकरेंच्या शिवसेनेकडून संदीप गोपाळराव गुळवे समता पार्टीचे भागवत धोंडीबा गायकवाड, तसेच अपक्ष म्हणून अनिल शांताराम तेजा, अमृतराव उर्फ आप्पासाहेब रामराव शिंदे, इरफान मो. इसहाक (नादिर), भाऊसाहेब नारायण कचरे, विवेक बीपीन कोल्हे, रवींद्र माधवराव कोल्हे, संदीप वसंतदादा कोल्हे, भगवान पंडित गवारे, संदीप वामन गुरुळे, सचिन रमेश झगडे, दिलीप काशिनाथ डोंगरे, छगन भिकाजी पानसरे, रणजीत बाबासाहेब बोंडे, महेश भिका शिरुडे, रतन राजलदास चावला, आरडी निकम, संदीप गुळवे (पाटील) यांच्यासह प्रमुख उमेदवारांचा समावेश आहे.

शिक्षक-पदवीधर मतदारसंघासाठी कोण-कोण उमेदवार?
नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत सध्याच्या घडीला राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार महेंद्र भावसार, शिवसेना शिंदे गटाकडून किशोर दराडे आणि शिवसेना ठाकरे गटाचे संदीप गुळवे हे मैदानात आहेत.
मुंबई शिक्षक मतदारसंघात अजित पवार गटाचे शिवाजी नलावडे, ठाकरे गटाचे ज मो अभ्यंकर, शिक्षकभारतीचे सुभाष मोरे आणि भाजप पुरस्कृत शिवनाथ दराडे हे सध्याच्या घडीचे उमेदवार आहेत.
मुंबई पदवीधर मतदारसंघाची निवडणूक ही तगडी आहे. कारण इथे ठाकरे गटाचे उमेदवार अनिल परब यांच्या विरोधात भाजपचे उमेदवार किरण शेलार यांच्यात आहे.
कोकण पदवीधर मतदारसंघातील लढत ही भाजपचे उमेदवार निरंजन डावखरे विरुद्ध काँग्रेसचे उमेदवार रमेश कीर अशी थेट आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles