Monday, July 22, 2024

शिक्षक मतदारसंघ तब्बल 24 तासांनी निकाल जाहीर, किशोर दराडे विजयी

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता विधान परिषदेच्या दोन शिक्षक आणि दोन पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. गेल्या 26 जूनला या चार जागांसाठी मतदान पार पडले. आता नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी तब्बल 24 तासांपासून सुरुच असल्याचे पाहायला मिळत आहे. नाशिक शिक्षक मतदारसंघात पहिल्या आणि दुसऱ्या पसंतीच्या मतमोजणीत शिवसेना शिंदे गटाचे किशोर दराडे विजयी झाले आहेत. त्यानंतर अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे आणि महाविकास आघडीचे संदिप गुळवे यांचा पराभव झाला आहे.

नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी तब्बल 24 तासांपासून सुरुच आहे. पहिल्या पसंती क्रमांकाचा कोटा पूर्ण न केल्याने दुसऱ्या पसंतीच्या मतांची मतगणना सध्या सुरु आहे. या पहिल्या आणि दुसऱ्या पसंतीच्या मतमोजणीत शिवसेना शिंदे गटाचे किशोर दराडे हे आघाडीवर आहेत. तर बाद फेरीतील मतगणनेत आतापर्यंत 18 उमेदवार बाद ठरवण्यात आले आहेत.

नाशिक शिक्षक मतदारसंघात विजयासाठी 31576 चा कोटा निश्चित करण्यात आला आहे. त्यामुळे विजयासाठी किशोर दराडे यांना दुसऱ्या पसंतीची 5100 मतं आवश्यक आहेत. त्यामुळे सध्या महायुतीचे किशोर दराडे यांची विजयाकडे वाटचाल सुरु असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांनी मात्र महाविकासआघाडीचे गणित बिघडवल्याचे दिसत आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles