आज सकाळपासून विधानपरिषदेच्या नाशिक शिक्षक मतदारसंघांसाठी नाशिक विभागातील ९० मतदान केंद्रांवर मतदान सुरु आहे. यात नाशिक जिल्ह्यातील २९ मतदान केंद्रांवर मतदान सुरू आहे. मात्र, हे मतदान काही मतदान केंद्रांवर संथगतीने सुरु असल्याने शिक्षक हैराण झाल्याचे पाहायला मिळत आहे.
नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणुकीतून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिक्षक मतदारसंघाबाहेर मतदानासाठी पैशांचं पाकिट वाटप होत असल्याचा आरोप ठाकरे गटाने केला. या पैशांच्या पाकिटावर उमेदवारचे नाव असल्याची माहिती हाती आली आहे. तसेच मतदान केंद्राबाहेर पाकिट वाटप करणाऱ्या व्यक्तीलाही ठाकरे गटाने पोलिसांत नेलं आहे. या प्रकारानंतर मतदारसंघाबाहेर एकच गोंधळ पाहायला मिळाला.