Thursday, March 27, 2025

नाशिक शिक्षक मतदारसंघ, भाजपकडून कोल्हेंची तयारी असताना अजितदादांचा शिलेदारही रिंगणात उतरण्याच्या तयारीत

नुकतीच जाहीर झालेली नाशिक विभाग शिक्षक विधानपरिषद निवडणूक ताकतीने लढवणार असल्याचे मत विधान महाराष्ट्र राज्य पणन महामंडळचे विद्यमान अध्यक्ष प्रा.दत्तात्रय भाऊसाहेब पानसरे यांनी केले आहे. नाशिक शिक्षक मतदारसंघ, भाजपकडून कोल्हेंची तयारी असताना अजितदादांचा शिलेदारही रिंगणात उतरण्याच्या तयारीत

घारगाव ( ता. श्रीगोंदा ) येथील सामान्य शेतकरी कुटुंबात जन्माला आलेले पानसरे यांनी अतिशय लहान वयात आपल्या राजकीय, सामजिक कार्याला सुरुवात केलेली आहे. अकल्पित नेतृत्वगुण, उत्तम प्रतीचे संगठन कौशल्य,धडाडीने काम करण्याची वृत्ती या गुणांमुळे कुठलाही राजकीय वारसा नसताना एक सामान्य शिक्षक ते पंचायत समिती सदस्य, जि.प.सदस्य, अहमदनगर जिल्हा सहकारी बँक संचालक, महाराष्ट्र राज्य पणन महामंडळ मुंबई चे विद्यमान अध्यक्ष अशा विविध पदांवर काम करण्याची संधी मिळालेली आहे.

ह्या पदांवर काम करत असतना अतिशय अभ्यासपूर्वक विविध प्रश्नांची सोडवणूक करून जनतेला न्याय देण्याचे काम केलेले आहे. सन १९९९ पासुन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे व्यवसायिक अभ्यासक्रम देणारे महाविद्यालये अहमदनगर व पुणे जिल्ह्यामध्ये सुरु करून खऱ्या अर्थाने ज्ञानगंगा खेडोपाडी पोहचविण्याचे काम केलेले आहे. त्याअंतर्गत आज राज्यभरातून हजारो विद्यार्थी दर्जेदार शिक्षण घेत असून स्वावलंबी बनून जीवन जगत आहेत.

समाजाला खरी दिशादेणाऱ्या शिक्षक बंधू आणि भगिनींचे वर्षानुवर्षापासून शासन दरबारी अनुदान , पेन्शन ,नियुक्ती, संच मान्यता, वैद्यकीय प्रतिपूर्ती, शाळाबाह्य कामकाज असे अनेकविविध प्रश्न प्रलंबित आहेत. या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी व त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी नाशिक विभागातील अनेक शिक्षक बंधू आणि भगिनीं च्या आग्रहाखातर आपण ही निवडणूक लढवत असल्याचे पानसरे यांनी सांगितले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles