विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी ‘टीडीएफ’कडून उमेदवारी मिळालेले संदीप गुळवे यांना शिवसेना (ठाकरे गट) पाठिंबा मिळाल्याचे समजते. महाआघाडीकडून आता गुळवे यांना पाठिंबा दिला जाणार असल्याचे निश्चित मानले जातय. परिणामी नाशिक विभागाचे शिवसेना (ठाकरे गट) पुरस्कृत विद्यमान शिक्षक आमदार किशोर दराडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून महायुतीमार्फत पाठिंबा मिळविण्याचा प्रयत्न करीत असल्याची चर्चा आहे.
किशोर दराडे शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचे समजल्यामुळे गुळवे यांना पाठिंबा देण्याबाबत शिक्षक सेनेचे विभागीय अध्यक्ष संजय चव्हाण यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांशी ठाकरे गटामार्फत चर्चा करण्यात आली होती.