“पुणे शहरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेवेळी शरद पवार यांच्यावर बोलू नये अशी विनंती मी स्वतः केली होती. मात्र नेमकं त्याचवेळी नरेंद्र मोदींनी शरद पवारांचा उल्लेख ‘भटकती आत्मा’ असा केला. त्यामुळे निवडणुकीत मोठा फटका बसला”, याची कबुली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. ते नाशिक येथे बोलत होते.
महायुतीच्या येवला लासलगाव मतदारसंघातील नेत्यांची बैठक झाली. मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या येवला येथील कार्यालयात सुरू महायुतीची बैठक होती.बैठकीत नाशिक लोकसभा मतदार संघातील पराभवाबाबत चर्चा सुरू आहे. आगामी विधानसभेत नाशिक जिल्हयातून जास्तीत जास्त जागा कशा आणायच्या याबाबत देखील या बैठकीत चर्चा झाली. एबीपी माझाने सदर वृत्त दिले आहे.