प्रतिज्ञापत्रातून पंतप्रधान मोदींनी त्यांनी केलेल्या गुंतवणुकींबाबतही माहिती दिली. महत्त्वाची आणि लक्ष वेधून घेणारी बाब म्हणजे, मोदींच्या प्रतिज्ञापत्रात पोस्ट ऑफिसच्या पंतप्रधान मोदींनी निवडणूक आयोगात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात पोस्ट ऑफिसच्या नॅशनल सेविंग्स सर्टिफिकेट या योजनेतील गुंतवणुकीबाबत माहिती दिली होती. पंतप्रधानांनी या योजनेत 9.12 लाख रुपयांची गुंतवणूक केली आहे. NSC ही एक ठेव योजना आहे, ज्यामध्ये रक्कम 5 वर्षांसाठी गुंतवता येते. सध्या या योजनेवर 7.7 टक्के इतका व्याजदर आहे. योजनांचा उल्लेख होता. कोणताही भारतीय नागरिक नॅशनल सेविंग्स सर्टिफिकेट योजनेत गुंतवणूक करू शकतो. या योजनेअंतर्गत जॉईंट अकाउंटचीही सुविधा आहे. NSC मधील गुंतवणूक किमान एक हजार रुपयांपासून सुरू केली जाऊ शकते. आणि कमाल गुंतवणुकीसाठी कोणतीही मर्यादा निश्चित करण्यात आलेली नाही. म्हणजेच, तुम्ही त्यात कितीही कमाल रक्कम गुंतवू शकता. या योजनेवर 80C अंतर्गत कर लाभ देखील उपलब्ध आहे.
पंतप्रधान मोदींनी गुंतवलेत 9 लाखांहून अधिक रक्कम… काय आहे पोस्टाची ही योजना, वाचा सविस्तर
- Advertisement -