Saturday, April 27, 2024

अजित दादांना धक्का, लोकसभा निवडणुकीत ‘या’ ठिकाणी नाही वापरता येणार पक्षाचं चिन्ह

लोकसभा निवडणुकीदरम्यान एक मोठी बातमी हाती आली आहे. पहिल्या टप्प्यात होणाऱ्या लक्षद्वीपमधील लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने घड्याळ हे चिन्हं वापरू नये असे निर्देश निवडणूक आयोगाने दिलेत. यामुळे अजित पवार यांना निवडणुकीपूर्वी मोठा धक्का बसल्याचं म्हटलं जात आहे. लक्षद्वीप लोकसभेसाठी घड्याळ चिन्ह मिळणार नाहीये. महाराष्ट्र आणि नागालँडमध्ये तूर्तास चिन्हं वापरायला परवानगी आहे.

लक्षद्वीपमध्ये पाहिल्या टप्प्यात लोकसभेसाठी मतदान होणार आहे. लक्षद्वीपमध्ये अजित पवार यांच्या पक्षाचे उमेदवार युसूफ टी पी यांना दुसऱ्या चिन्हावर निवडणूक लढवावी लागणार आहे. निवडणूक आयोगाकडे राष्ट्रवादीचा अर्ज उशिरा दाखल झाल्यामुळे आयोगाने हा निर्णय दिलाय. दरम्यान महाराष्ट्र आणि नागालँडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला चिन्ह वापरता येणार आहे.येथील सार्वत्रिक निवडणुकांत अजित पवार यांच्या प्रत्येक उमेदवाराला घड्याळावर लढता यावे, यासाठी त्यांनी अर्ज केला होता. चिन्ह आदेश परिच्छेद १० नुसार निवडणुकांची अधिसूचना निघाल्यानंतर जास्तीत जास्त तिसऱ्या दिवशी कॉमन चिन्हाचा अर्ज ग्राह्य धरला जात असतो.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles