नवनीत राणा यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांच्याप्रमाणे आता रवी राणा देखील भाजपमध्ये प्रवेश करणार अशा चर्चा सुरू आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि बच्चू कडू यांनी देखील याबाबत भाष्य केलं होतं. त्यावर नवनीत राणांनी थेट स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे.मी रवी राणा यांची बायको म्हणून सांगतो मी भाजपमध्ये आहे. माझे नेते नरेंद्र मोदी, अमीत शहा व देवेंद्र फडणवीस आहेत. मी माझा निर्णय स्वतः घेतलाय. रवी राणा देखील त्यांच्या मर्जीनुसारनिर्णय घेतील. त्यामुळे नवरा बायकोमध्ये बाहेरच्यांनी न बोललेलं बरं, असा टोला नवनीत राणा यांनी लगावला आहे.
एक दिवस नवनीत राणा स्वत:च रवी राणा यांना भाजपमध्ये आणतील. आज जरी ते आपल्या पक्षात नसले तरी उद्या असतील. नवनीत राणा स्वत: रवी राणा यांना याबाबत आदेश देतील, असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला होता.