भाजप नेत्या नवनीत राणा पुन्हा खासदार होण्याची शक्यता आहे. लवकरच त्यांची राज्यसभेवर वर्णी लागणार, अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यामागचं कारणही तसंच आहे. नवनीत राणा पुन्हा खासदार होणारच असं वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलंय.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठिंब्याने 2019 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा अमरावतीच्या खासदार म्हणून निवडून आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी अपक्ष निवडणूक लढवत शिवसेनेचे नेते आनंदराव आडसूळ यांचा पराभव केला होता. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा या भाजपच्या तिकीटावर उभ्या राहिल्या.