राज्यातील लोकसभेची निवडणूक पाच टप्प्यात पार पडली आहे. निकाल ४ तारखेला लागणार आहे. त्याआधीच राज्यातील पक्षांना विधानसभेचे वेध लागले आहेत. त्यापार्श्वभूमीवर हालचाली सुरू झाल्या आहेत. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसअजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांनी मोठा गौप्यस्फोट केला असून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये लवकरच इनकमिंग होणार असल्याचा दावा केला आहे. राज्यातील काही नेते आपल्या आणि अजित पवार यांच्या संपर्कात असल्याचा त्यांनी दावा केला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या आधी राज्यात मोठे बदल पहायला मिळाले. अनेक नेत्यांनी मूळ पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात प्रवेश केला होता. अशोक चव्हाण, मिलिंद देवरा आणि संजय निरुप या बड्या नेत्यांनी अनेक वर्षांची कॉंग्रेसची साथ सोडून भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. राष्ट्रवादी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचं निशाण अनेक नेत्यांनी घेतलं होतं. आता काही महिन्यांनंतर विधानसभेच्या निवडणुका होतील. त्यावेळीही पक्षप्रवेशाला उत येण्याची शक्यता आहे. सुनील तटकरे यांनी केलेलं आज केलेल्या विधानांवरून त्याचे संकेत मिळतायेत.
सुनील तटकरे यांनी लवकरच राष्ट्रवादीत मोठं इनकमिंग सुरू होणार आहे. काही नेते आपल्या आणि अजित पवारांच्या संपर्कात आहेत. प्रफुल पटेल यांच्याही संपर्कात काही नेते आहे. वेळ आल्यानंतर ती नावं जाहीर करण्यात येतील आणि पक्षात प्रवेश दिला जाईल असं त्यांनी म्हटलं आहे.