राष्ट्रवादी काँग्रेसच्या आता 54 जागा आहेत, त्या आपल्याला मिळणारच आहेत, पण त्याशिवाय काँग्रसच्या जागाही मिळणार आहेत. 90 च्या आसपास जागा आपल्याला मिळणार आहेत. राष्ट्रवादीचा 71 चा आकडा पुढे घेऊन जाणारच, महाराष्ट्र पिंजून काढणार. पायाला भिंगरी लावल्यासारखे फिरू, असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले आहेत.
समोर बीआरएस वंचित आहे त्यांची एकत्र यायची शक्यता दाट आहे, काँग्रेस-शिवसेनेची आघाडी कशी होणार माहिती नाही, त्यात बऱ्याच खाचाखोचा आहेत, असं विधान अजित पवारांनी केलं.