धनंजय मुंडेंना संपवण्यासाठी सुरेश धसांनी सुपारी घेतली…त्यासाठी एक सामाजिक कार्यकर्त्या कामाला लावल्या आहेत

0
59

बीडचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी राज्याचं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या प्रकरणातील प्रमुख आरोपी हे बीड राष्ट्रवादी पक्षाशी संबंधित आहेत. तसेच धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय समजला जाणारा वाल्मिक कराड हा त्या संबंधित खंडणी प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. यावरून आरोप-प्रत्यारोप होत असताना अमोल मिटकरी यांनी धनंजय मुंडे यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.


केवळ पंकजाताई व श्री धनंजयजी मुंडे दोघे बहीण भाऊ एकत्र आल्याने महायुतीचे व विरोधातील आमदार एकत्र येऊन आमदार सुरेश धस यांच्या माध्यमातुन जाणीवपपुर्वक धनंजयजी मुंडे यांच्या राजकीय कारकिर्दीला संपवण्याचं पद्धतशीर काम करत आहेत असे.त्यासाठी एक सामाजिक कार्यकर्त्या कामाला लावल्या आहेत. संजय राऊत व सुरेश धस यांनी यात उपमुख्यमंत्री अजितदादाना टार्गेट करने सुरु केले आहे. या हत्याकांडातील आरोपी फासावर गेले पाहिजे ही धनंजय मुंडे साहेबांची सुरुवात पासुन भुमिका असताना या प्रकरणात श्री धनंजय मुंडे यांचं राजकारण संपवण्याची सुपारी घेतल्याच्या भूमिकेत धस आले आहेत.

https://x.com/amolmitkari22/status/1872542026174263621