Saturday, March 2, 2024

Wait अँड Watch… अजित पवारांवर बोलताना थोडं सबुरीनं घ्या.. खा.अमोल कोल्हेंना इशारा

राष्ट्रवादी काँग्रसचे खासदार अमोल कोल्हे यांची ‘शेतकरी सन्मान यात्रे’ची सभा बारामतीतील काटेवाडीत पार पडली. यावेळी अमोल कोल्हेंनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लक्ष्य केलं. “वाघ जंगलात फिरताना आपल्याला तो राजा वाटतो. पण, सर्कशीत रिंगमास्टच्या इशाऱ्यावर कसरती करताना आपल्या काळजाला वेदना होतात,” असं म्हणत अप्रत्यक्षपणे अमोल कोल्हेंनी अजित पवारांवर हल्लाबोल केला. याला अजित पवार गटातील आमदार अमोल मिटकरींनी प्रत्युत्तर दिलं आहे.

अमोल मिटकरी म्हणाले, “अमोल कोल्हेंसारख्या अतिसामान्य व्यक्तीला शिरूरमध्ये निवडणूक लढायला लावत अजित पवारांनी वाघ बनवलं. आता अमोल कोल्हेंनी काटेवाडीत जाऊन अजित पवारांची सर्कशीतील वाघाशी तुलना करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा कोल्हेंच्या उत्तुंग बुद्धिमत्तेवर हसावं वाटतं. कोण सर्कशीतलं आणि कोण जंगलातलं हे दिल्लीपासून महाराष्ट्रापर्यंत माहिती आहे.”
“अमोल कोल्हे आणि सुप्रिया सुळेंना संघर्ष यात्रा काढावी लागत असेल, तर हेच अजित पवारांचं वेगळेपण आहे. अजित पवारांनी अमोल कोल्हे आणि सुप्रिया सुळेंना कामावं लावलं आहे. अजित पवारांवर बोलताना थोडं सबुरीनं घ्यावं. बारामतीची लोक फार हुशार आहेत. येणाऱ्या काळात काय केलं पाहिजे, हे बारामतीची लोकांना माहिती आहे. त्यामुळे Wait अँड Watch… अजित पवारांशी बरोबरी करू नका,” असा इशारा अमोल मिटकरींनी अमोल कोल्हेंना दिला आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles