नाशिकचं पालकमंत्रीपद कधीपर्यंत जाहीर होईल हे मला माहिती नाही. मी त्या चर्चेत नाही. याचं चांगलं उत्तर मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्रीच देऊ शकतील. माझी इच्छा काय आहे हा महत्त्वाचा मुद्दा नाही. नाशिकमध्ये सर्वाधिक आमदार आमचे आहेत. सहा आमदार आहेत. सातवे खोसकरही आमचेच आहेत. त्यामुळे तिथे पालकमंत्रीपदावर आमचा दावा आहे. रायगडच्या बाबतीतही आमचे आमदार मंत्री आहेतच. पण आमचे खासदार आहेत. कोकण विभागात एक तरी जिल्हा आम्हाला हवाय ही आमची भूमिका आहे. आता त्यावर काय तोडगा निघतो बघू – मंत्री छगन भुजबळ