Friday, June 14, 2024

पायाला भिंगरी बांधून महाराष्ट्र पिंजून काढला, जयंत पाटलांनी केला अनोखा विक्रम…व्हिडिओ

राज्यातील लोकसभा निवडणुकांचा रणसंग्राम आता अंतिम टप्प्यात आला आहे. काल राज्यातील पाचवा आणि अंतिम टप्प्याचा प्रचार संपला. गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या प्रचाराच्या तोफा अखेर थंडावल्या. या प्रचारादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी तब्बल १०० सभा घेत अनोखा विक्रम केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये उभी फूट पडल्यानंतर नवा पक्ष घेऊन मैदानात उतरण्याचे मोठे आव्हान शरच पवार यांच्यासह पक्षातील नेत्यांसमोर होते. स्वतः शरद पवार यांनी लोकसभेच्या प्रचारात संपुर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. त्यांच्यापाठोपाठ पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही तब्बल १०० सभा घेण्याचा अनोखा विक्रम केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या अधिकृत एक्स हँडल्सवरून ही माहिती देण्यात आली आहे. याबाबत पक्षाच्या अधिकृत सोशल मीडिया हँडल्सवर एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यात दिनांक ८ एप्रिल २०२४पासून (लोकसभा प्रचार सुरू झाल्यापासून) ते आजपर्यंतच्या सभांचे ठिकाण तारखेसह देण्यात आले आहे.
https://x.com/NCPspeaks/status/1791789579349245979?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1791793670666240407%7Ctwgr%5Eeeb9f1d2f12b9b416456a9bc597c107f80f2f39d%7Ctwcon%5Es3_&ref_url=https%3A%2F%2Fsaamtv.esakal.com%2Flok-sabha-election%2Fmaharashtra-loksabha-election-2024-ncp-leader-jayant-patil-100-campaigning-sabha-gp98

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles