Saturday, December 7, 2024

भाजपाकडे बहुमत असताना ते माझं का ऐकत होते?…

“राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी २०१९ मध्ये राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची सूचना केली होती,” असं विधान देवेंद्र फडणवीसांनी केलं. याला शरद पवारांनी प्रत्युत्तर दिलं आहे.यावर ‘इंडिया टुडेच्या कॉन्क्लेव्ह’मध्ये संवाद साधताना शरद पवार म्हणाले, “आम्ही सत्तेत नव्हतो. भाजपा सत्तेत होता. त्यांच्याकडे जास्त आमदार होते. भाजपाला जास्त जागा मिळाल्या होत्या. राष्ट्रवादी राजवट लागू करण्याचा निर्णय त्यांचाच होता. भाजपाकडे बहुमत होतं, तर त्यांनी मला का विचारालं? भाजपानं राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा निर्णय का घेतला?”शरद पवारांची पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्याबरोबर चर्चा सुरू होती, असा दावा फडणवीसांनी केला आहे. याबद्दल विचारल्यावर शरद पवारांनी म्हटलं, “ही चुकीची माहिती आहे. प्रश्न हाच आहे की, भाजपाकडे बहुमत असताना ते माझं का ऐकत होते?”

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles