Friday, February 7, 2025

अजित पवार म्हणाले, निलेश लंके पारनेरपुरते लोकप्रिय…खासदारकीच्या निवडणुकीत तो टिकणार नाही

पारनेरचे आमदार निलेश लंके हे आज शरद पवार यांच्या गटात प्रवेश करणार आहेत. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार हे बारामती दौऱ्यावर आहेत. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना निलेश लंके यांच्याबाबत आपली भूमिका मांडली आहे. यावेळी अजित पवार म्हणाले की, “वास्तविक निलेश लंकेला पक्षात मी आणलं त्याला मनापासून आधार मी दिला. आताही विकास कामांसाठी निलेशला मोठ्या प्रमाणावर मदत मी केलेली आहे, निलेश माझ्याकडे आला होता. मी निलेशसोबत चर्चा केली. त्याला काही गोष्टी समजून सांगितल्या. पण काही लोकांनी त्याच्या मनात हवा घातली आहे की, तू खासदार होशील म्हणून पण वास्तव तसं नाहीये. निलेश पारनेरपुरता लोकप्रिय आहे. पण बाकीच्या मतदारसंघात त्याला वाटतं तितकं सोपं नाही. मी त्याला सांगितलं होतं, तू तशा पद्धतीने वागू नको. जितकं समजून सांगणं गरजेचं आहे. तितकं मी केलेलं आहे. आता त्याचा निर्णय” असल्याचे अजित पवार म्हणालेत.

या संदर्भात मी निलेश लंके यांच्याशी बोललो आहे, तसेच देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतही त्यांची चर्चा करून दिलेली आहे. निवडणुकीनंतर आपण पुन्हा एकदा बसू. त्याचबरोबर संबंधित मंत्र्यांनाही एकत्र बोलवू आणि जे समज गैरसमज आहेत, ते दूर करू अशा स्वरूपाची माहिती दिली होती. मात्र त्यानंतरही अशा प्रकारची चर्चा चॅनल मधून होताना दिसत आहे. त्यामुळे जेवढे समजून सांगायचे तेवढे सांगितले. खरंतर निलेश हा चांगला आमदार आहे. त्याची लोकप्रियता पारनेर तालुक्यात आहे, मात्र पारनेर तालुक्याच्या बाहेर त्याची फारशी लोकप्रियता नाही. त्यामुळे खासदारकीच्या निवडणुकीत तो टिकणार नाही अशी त्याला माहिती दिली होती, मात्र तरी देखील त्याचा निर्णय असेल, तर त्याबाबत आपण काय बोलणार? अर्थात आमदार अपात्रतेचा निकष लक्षात घेता, त्याला अगोदर आमदार पदाचा राजीनामा द्यावा लागेल. मात्र मला समोरच्या महाविकास आघाडीतील नेत्यांच्या आश्चर्य वाटते अगोदर त्यांनी कोणालाही घेणार नाही असे सांगितले आणि नंतर मात्र त्यांनी आता निलेश, निलेश करायला सुरुवात केली आहे, हे चुकीचे आहे असे अजित पवार म्हणाले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles