राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्जत येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत भाषण करताना शरद पवारांवर शरसंधान केले. यावेळी अजित पवारांनी आ.रोहित पवार यांच्यावरही नाव न घेता टिका केली. काही काही जण सध्या गुडघ्याला बाशिंग बांधून फिरायला लागले आहेत. संघर्ष करायला फिरत आहेत. कसला संघर्ष, त्यांनी कधी आयुष्यात संघर्ष केला नाही आता कशाला, असा सवाल विचारत अजितदादांनी रोहित पवारांच्या युवा संघर्ष यात्रेवर टिका केली.