राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडण्यापूर्वी भाजपचे खासदार सुजय विखे व राष्ट्रवादी काँग्रेसचे पारनेरचे आमदार निलेश लंके यांची लढत ‘फिक्स’ मानली जात होती. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर लंके अजित पवार गटात दाखल झाले. परंतु आता शरद पवार गटाकडून त्यांना ऑफर येऊ लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईतील राष्ट्रवादी भवन येथे ही बैठक झाली. या बैठकीत दिंडोरी, नगर, हिंगोली, वर्धा, अमरावती, बीड, भिवंडी आणि जालना लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यात आला. या बैठकीत कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार, राहुरीचे आमदार प्राजक्त तनपुरे यांच्यासह इतरांची नावे आली. परंतु या बैठकीला काही लंके समर्थकही पदाधिकारी होते. पारनेरचे तालुकाध्यक्ष बाबाजी तरटे यांनी बैठकीत आमदार लंके पवार यांच्यासोबत असल्याचे सांगितले. पण, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना तरटे यांना मध्येच थांबवत हे स्वत: लंके यांना जाहीर करू द्या, असे सूचवत ते आमच्याकडेही आले तरी लोकसभेचे उमेदवारीच दसरापूर्वीच जाहीर करू अशी खुली ऑफरच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे.
जयंत पाटील यांची लंकेंना खुली ऑफर…परत या लोकसभेची उमेदवारी मिळवा…
- Advertisement -