केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे मुंबई दौऱ्यावर आले असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नाराजीची चर्चा सुरू झाली आहे.
अमित शाह यांच्या या दौऱ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हजर होते. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर होते.
गेल्या अनेक दिवसांपासून अजित पवारांना डावललं जात आहे, अशी भावना त्यांच्या मनात दिसतेय, अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. अजित पवारांच्या नाराजीवर एकनाथ खडसे म्हणाले, “अजित पवार महायुतीत राहिले की नाही राहिले, हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. पण गेल्या अनेक दिवसांपासून अजित पवारांना डावललं जात आहे, अशी भावना त्यांच्या मनात दिसतेय. त्यामुळे त्यांनी नाराजीची भावना व्यक्त केली असावी.”