Tuesday, May 28, 2024

मोठा गौप्यस्फोट…शरद पवार २०१४ पासूनच भाजप सोबत जाण्यासाठी तयार होते…

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवार यांचा उल्लेख करत मोठा दावा केला आहे. ‘राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर शरद पवारदेखील भाजपाबरोबर येण्यास ५० टक्के अनुकूल होते, मात्र नंतर त्यांनी वेगळा विचार केला’, असा दावा प्रफुल्ल पटेल यांनी ‘एएनआय’ला दिलेल्या मुलाखतीत केला आहे.

राज्याचे अन्न तथा नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनीदेखील पटेलांच्या दाव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. भुजबळ म्हणाले, मी त्याबद्दल काही ऐकलं नाही. परंतु, शरद पवारांनी आधीसुद्धा भाजपाप्रणित एनडीएत जाण्याचा प्रयत्न केलेला. २०१४ च्या निवडणुकीतही पवारांनी तसा प्रयत्न केलेला. तुम्हा सर्वांना आठवत असेल, २०१४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना-भाजपात बिनसलं होतं, भाजपाचे बहुमतापेक्षा थोडे कमी आमदार होते, तेव्हा आम्ही (राष्ट्रवादी काँग्रेसने) भाजपाच्या सरकारला बाहेरून पाठिंबा दिला होता. तेव्हापासूनच हे सगळं चाललेलं.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles