Wednesday, November 29, 2023

शरद पवारांचा आदेश अन् रोहित पवारांनी उचललं मोठं पाऊल

पुणे : राज्यात सुरू असलेल्या राजकीय धोरणांमुळे युवा वर्ग मोठा प्रमाणात भरडला गेला आहे. स्पर्धा परीक्षा देणारे युवा, उत्तीर्ण होऊन सुद्धा बेरोज असलेले उमेदवार, कंत्राटी पद्धतीत सुरू झालेली नोकरभरती. अश्या सगळ्या युवांचे प्रश्न घेऊन आमदार रोहित पवार यांनी युवा संघर्ष यात्रेचे आयोजन केले आहे. पुणे ते नागपूर या यात्रेचा मार्ग असणार आहे. रोहित पवार यांची आज पत्रकार परिषद पुण्यात आयोजित करण्यात आली होती.

आज राज्यात शासनाच्या चुकीच्या धोरणांचा फटका हा सर्वसामान्य युवांना बसत आहे. शासनाच्या या धोरणांचा राज्यात सर्वत्र विरोध होत आहे. अशातच राज्याच्या विविध भागात युवावर्ग आंदोलन देखील करत आहे. परंतु सरकार मात्र आपल्या राजकारणात व्यस्त असल्याने त्यांचे युवा वर्गाच्या या विषयाकडे सपशेल दुर्लक्ष असल्याचे पाहायला मिळत आहे.
सर्वसामान्य विद्यार्थ्यांना फी परवडत नसल्याने फी कमी करण्याची मागणी विधानसभेत आम्ही आग्रहीपणे मांडली यावेळी सिरीयसनेस यावा यासाठी परीक्षा फी १००० रुपये ठेवल्याचे सरकारने सांगितले. पेपरफुटी संदर्भात सांगितलं तर सरकार हक्क भंग आणण्याची भाषा करते, कंत्राटी भरतीचा मुद्दा मांडला तर सरकार सांगते एका कर्मचाऱ्यांच्या पगारात तीन कर्मचारी काम करतील.
एकूणच सरकारच्या संवेदना संपल्या असून सरकार युवकांना गृहीत धरून चालत आहे अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर गांधी जयंतीच्या निमित्ताने आम्ही आदरणीय पवार साहेबांशी याबाबत चर्चा केली आणि यावेळी पवार साहेबांनी राज्यव्यापी युवा संघर्ष यात्रा काढून युवांशी संवाद साधण्याच्या सूचना आम्हाला केल्या त्यानुसारच राज्यातील तमाम तरुणांशी संवाद साधण्यासाठी आणि युवा वर्गाला पाठिंबा देण्यासाठी एका नवीन उपक्रमाची सुरुवात आपण करत असल्याचे रोहित पवार यांनी सांगितले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles

%d bloggers like this: